Skip to content

BLA तक्रार

DigiDakshडिजीदक्ष उपक्रम

मतदार हक्क संरक्षण

तुमच्या नावाविरुद्ध खोटा नमुना ७ आक्षेप? आता कायदेशीर तक्रार करा.

काही बूथ स्तरीय प्रतिनिधी (बी.एल.ए.) पुराव्याशिवाय, सरसकट नमुना ७ भरून नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न करत आहेत. फक्त काही मिनिटांत तुमची माहिती भरा आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे देण्यासाठी तयार, कायदेशीर मराठी तक्रार अर्ज मोफत मिळवा.

कसे करायचे ते पाहा
  • पूर्णपणे मोफत
  • कायदेशीर मराठी
  • प्रिंटसाठी तयार PDF

हे का महत्त्वाचे आहे?

१

नमुना ७ म्हणजे काय?

मतदार यादीतील एखाद्या नावाला आक्षेप घेऊन ते वगळण्याची मागणी करण्याचा हा अर्ज आहे. तो निश्चित कारण आणि पुराव्यासह, वैयक्तिक माहितीवरच भरता येतो.

२

खोटा आक्षेप हा गुन्हा

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ नुसार खोटे निवेदन केल्यास एक वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो. भारतीय न्याय संहितेतील कलमेही लागू होतात.

३

सुनावणीशिवाय नाव वगळता येत नाही

कायद्यानुसार तुम्हाला लेखी नोटीस देऊन तुमचे म्हणणे ऐकल्याशिवाय तुमचे नाव वगळता येत नाही. ही तक्रार तुमचा हा हक्क लेखी नोंदवते.

तक्रार कशी दाखल करायची — सोपे ८ टप्पे

  1. तुमचा मोबाईल क्रमांक टाकून मोफत लॉगिन करा.
  2. मतदार ओळखपत्र व मतदार यादीप्रमाणे तुमची माहिती अचूक भरा.
  3. आक्षेपात तुमच्याबाबत कोणते खोटे कारण दिले आहे ते निवडा.
  4. PDF डाउनलोड करा आणि त्याच्या दोन प्रती छापा.
  5. दोन्ही प्रतींवर सत्यापनाखाली व शेवटी सही करा.
  6. आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडा.
  7. तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे अर्ज द्या आणि तुमच्या प्रतीवर पोच-शिक्का घ्या. शक्य नसल्यास रजिस्टर पोस्टाने पाठवा.
  8. सुनावणीची नोटीस आल्यास मूळ कागदपत्रांसह वेळेवर हजर राहा.

सोबत ठेवायची कागदपत्रे

  • मतदार ओळखपत्राची प्रत
  • मतदार यादीतील नावाचा उतारा
  • रहिवासाचा पुरावा: आधार, वीज बिल, घरपट्टी किंवा भाडेकरार
  • मिळालेली नोटीस किंवा ऑनलाईन माहितीची प्रिंट
  • शेजाऱ्यांचे लेखी निवेदन

नेहमीचे प्रश्न

ही सेवा खरंच मोफत आहे का?

हो. कोणतेही शुल्क नाही. फक्त नाव, शहर व मोबाईल क्रमांक देऊन लॉगिन करा.

ही तक्रार कोण करू शकतो?

ज्या मतदाराच्या नावाविरुद्ध नमुना ७ आक्षेप दाखल झाला आहे, तो मतदार स्वतः.

बी.एल.ए.चे नाव माहीत नसेल तर?

ती जागा रिकामी ठेवा. तक्रारीत "आक्षेप दाखल करणारी अज्ञात व्यक्ती" असे आपोआप लिहिले जाईल. चौकशीत नाव निष्पन्न होईल.

माझी माहिती सुरक्षित आहे का?

तुमची माहिती फक्त तुमचा अर्ज तयार करण्यासाठी आणि डिजीदक्ष उपक्रमाच्या संपर्कासाठी वापरली जाते. ती कोणालाही विकली जात नाही.

संकल्पना व रचना

ॲड. जुबेर नासिर शेख Adv. Juber Nasir Shaikh

B.Sc., LL.B., LL.M., Ph.D. (App.)

धुळे येथील वकील व मतदार हक्क कार्यकर्ते. SIR प्रक्रियेत नागरिकांना मोफत कायदेशीर साधने उपलब्ध करून देणाऱ्या डिजीदक्ष उपक्रमाचे संकल्पक.

डिजीदक्ष व दक्ष फाउंडेशनचा मोफत नागरिक सेवा उपक्रम · DigiDaksh · Daksh Foundation, Dhule

महत्त्वाचे: हा अर्ज तुम्ही दिलेल्या माहितीवर आधारित मसुदा आहे. त्यातील प्रत्येक माहिती खरी असल्याची खात्री करूनच सही करा. खोटी तक्रार करणे हा देखील गुन्हा आहे.